एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत.... गेली कीत्येक वर्षे तो रडलेला नाही.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
वसंताचं आगमन.
खिशात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर पडतो.
त्याची नजर त्या भिका-याकडे आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही, पण मझ्याकडे कला आहे,...मझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.. ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"
"साहेब" भिकारी म्हणतो " मझ्याशी कुणीबोलतदेखील नाही ...मी एक गरीब आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीकवाटतं ते करा."
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू लागलाय.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच जाते...
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर या पटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील."
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?
या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?
- अनामिक.
- मुळ लेखकास खूप खूप आभार....
आवडली तर नक्की शेयर करा...
No comments:
Post a Comment