Thursday, 1 March 2012

प्रश्न ??

आज बऱ्याच दिवसातून कॉलेजला आला होता तो.. तरी त्याचा लेक्चरला बसायचा मूड नव्हता हे मी ओळखलेलं..... कट्ट्यावर बसलो तर दोघेही शांत... शेवटी त्यालाच अवघडल्यासारखं झालं. स्पष्टपणे त्यालाही बोलता येत नव्हतं .त्यामुळे घोळून घोळून कोड्यात बोलायला लागला....
"निल्या, खरच काही प्रश्नांना उत्तर नसतात???"
"असतात पण शोधायची नसतात, कशाला हवीत असली उत्तरे??"- संकोचित हसून मी उत्तर तर दिला, पण खरं तर माझ्याकडेहि त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
"तू जेवतोस कशासाठी"
"जगण्यासाठी..." मी पटकन बोलून गेलो...
"तसच माझं झालंय"
तरीही काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता...तो असाच घोळून घोळून बोलत राहिला. याला समजावणं शक्य नाही कळून चुकलं होतं. माणसाला अशा वेळी सहानुभूतीत समजुतीच्या बोलापेक्षा समदुखीच हवा असतो. ...
शेवटी दाटून येऊन त्याचा संयम सुटला. म्हणाला-
"वैतागलोय रे या लाइफ ला... असं वाटत २-४ वर्षे पटकन निघून जावीत.. कधी कधी तर वाटत या व्यसनांच्या अधीन व्हावं"
"हो की मग,मस्त आयडिया आहे" मी सूचक हसत म्हणालो
"निल्या हे तू बोलातोयेस???"
"आता तूच तर म्हणालास ना.. बघ म्हणजे सगळं कळतंय तुला मग माझ्याकडून कसल्या समजुतीची अपेक्षा ठेवतोय, इथे प्रत्येकाचं असंच असतं, तुझ्या जागी मी असतो तर कशी समजूत काढली असतीस माझी, तशीच स्वतःची काढायची दुसऱ्यावर भावनिकरीत्या अवलंबून राहायचंच नाही, आपणच आपल्याला सहानुभूती द्यायची, कौतुकही आपणच करायचा, दोषही आपणच आपल्याला द्यायचे,आपलं सुख-दु:ख दुसऱ्याच्या मर्जीला चिकटलं की आपलं हसणं रडणं आपल्या हातात राहत नाही, आपलं दुख हे फक्त आपलंच दुख: असतं, दुसर्याला ते कळू शकत, जाणवू शकत नाही, मग का असल्या उसन्या सहानुभूतीची वाट पाहत बसतो, थोडा स्वाभिमान ठेव- मी रडतोय ते माझ्याच दु:खामुळे आणि हसेन ते सुद्धामाझ्याच मुळे. असा attitude ठेव.... "
माझ्या उत्तराने समाधान ना झाल्यासारखा तो हसला . म्हणाला-
"आपली सगळ्यात मोठी 'स्ट्रेन्थ' च जेव्हा आपला 'विकनेस' बनते तेव्हा खूपअवघड होतं रे"
पुन्हा आधीसारखीच शांतता...त्याला कायम्हणायचं कळलं होतं पण तसा भासावूही शकलो नाही. त्याच्या उत्तरातच पुन्हा एकदा प्रश्न होता... ज्याचा उत्तर खरच नव्हता... शेवटी तोच खरा ठरला... काही प्रश्नांना खरच उत्तरे नसतात का???
नकळत त्याला त्याचा समदु:खी मिळाला होता...तो मीच...

No comments:

Post a Comment