Tuesday, 11 September 2012

"फेसबुक "



एफबीवर गुडमॉर्निंग स्टेट्सने सुरू

होणारा तिचा दिवस ,

रात्री चॅटवर गुडनाइट म्हणतच संपतो . दिवसभरात

असंख्य

लाइक्स , कमेंट्स

आणि शेअर्सनी तिच्या व्हर्च्युअल

आयुष्याची टाइमलाइन व्यापलीय . सोशल साइट्स

प्रायव्हसी राखण्यात कमी पडत असल्याने

मुलींसाठी

सुरक्षित नाहीत असं बोललं जातंय . पण दुसरीकडे

एका

सर्व्हेतून सिद्ध झालंय की याच साइट्सना अॅडिक्ट

असणा ‍

ऱ्यांमध्ये मुलींची आणि महिलांची संख्या जास्त आहे .

या विरोधाभासामागचं नेमकं कारण काय ?...

सांगतायत स्वाती केतकर

रुपेश आणि रुपालीच्या दोन

वर्षांनंतरच्या रिलेशननंतर ...

घरी - बिरी सांगितल्यावर ते पद्धतशीरपणे ठरवतात

आता आपण रिलेशनबद्दल अनाऊन्स करायचं .

ती लगेचच एफबीवरचं स्टेटस चेंज करते .

रुपाली इज नाऊ कमिटेड . धडाधड लाइक्स

आणि कमेंटसची

बरसात होते . पण ...

स्टेटस चेंज झाल्यावर दहाच ‌ मिनिटात रुपेशला

रुपालीचा मेसेज येतो , ' आय डोंट थिंक इटस वर्किंग

एनीमोअर '. अचानक भयानक झालेल्या या बदलाचं

कारण रुपेशला कळतच नाही .

तो रुपालीला फोन लावतो . आधी फोन कट होतो .

ब ‍ ऱ्याच रिंगनंतर उचलल्या गेलेल्या फोनवर , खूप

सा ‍ ऱ्या

हुंदक्यांनंतर रुपाली सांगते , तू माझ्या रिलेशनशिप

स्टेटसला लाइक नाही केलंयस ..

रुपेश सुन्न . जगात असेल - नसेल तिकडनं

कनेक्टिव्हिटी शोधून

तो पहिलं ते लाइक करतो . कमेंट देतो . हुश्श !!!

वाचलो

बुवा .( रुपेशचा निश्वास )

थोडासा अतिरेक वाटला तरी हा किस्सा खरा आहे .

....

तो - हॅलो , आज चॅटवरची चटरपटर

इतकी कमी कशी काय

तुझी ?

ती - काही नाही रे आज कामाचा जाम लोड आहे

तो - मग चॅट काय करत बसलीयस , काम कर ना !

तुमचं बरं आहे ,

तुमच्या ऑफिसात पण या सोशल साइटसना परवानगी

आहे . आमचं बघ , फक्त घरी असताना एफबी वगैरे

लाड .

नाहीतर आहेच ऑफिसची नीरस वेबसाइट ...

ती - हू sssss

................

एक सहकारी - मला काय वाटतं ? कामाच्या वेळी ना

आपण ते एफबी वगैरे बंद ठेवू . म्हणजे इनक्लुडिंग

मी हां . ती मान

हलवते . पीसीवरचं एफबी बंद झालं तरी मोबाइलवरचं

तर

चालू असतं ना ...

................

- हाय बेब्ज

- हॅलो श्वीटी

- ए तू विशाखाच्या नव्या बीएफला पाहिलंस ?

कित्ती हँडसम आहे गं !

- नाही गं . तुला कुठे भेटले ते ?

- डम्बो ... कुठे काय त्याच्या अकाऊंटवर

फोटो पाहिले .

- आपल्याला कधी मिळणार गं असा कोणी ?

- काय माहिती ....

.............................

वर म्हटल्याप्रमाणे अशा ब ‍ ऱ्याच ऑनलाइन -

ऑफलाइन चॅट स‍ ्

आणि किश्श्यांनी अनेक एफबी अॅडिक्ट मैत्रिणींचा

दिवस सुरू होतो आणि संपतो . एका बाजूला या

साइट्सवर अपलोड केले गेलेले फोटो ,

माहिती प्रायव्हेट

रहात नाही अशा बातम्या ऐकू येत असतात . याच

असुरक्षिततेमुळे मुलींसाठी ते कसं सुरक्षित नाही

याच्याही चर्चा ऐकू येतात . अनेकजणी याच

कारणामुळे

सोशल साइट्सवरचं लॉगिन टाळतात . त्यावरच्या

प्रोफाइल्सबद्दलही त्या ब ‍ ऱ्यापैकी कॉन्शिअस

असतात

. पण दुस ‍ ऱ्या बाजूला एक सर्व्हे सांगतो , फेसबुक

किंवा

सोशल नेटवर्किंग साइट्सना अॅडिक्ट असणा ‍ ऱ्या

व्यक्तींमध्ये मुलींचं आणि स्त्र ‌ ियांचं प्रमाण जास्त

आहे .

या विरोधाभासाचं नेमकं कारण काय असावं ?

त्याचाच विचार करण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच .

या साइट्सवर ऑनलाइन राहणं , दिवसभरात अनेक

मित्र -

मैत्रिणींचे स्टेटस , फोटो अपडेट्स चेक करत राहणं ,

कधी

उत्साहाने रिअॅक्ट होणं तर

कधी नुसत्या लाइकची झलक

देणं हे मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं .

दिवसाच्या चोवीस तासातल्या अठरा तासांत

फेसबुकवर राहणा ‍ ऱ्यांमध्ये मुलींची संख्या वाढताना

दिसतेय . याचं कारण काय असेल हे जाणून

घेण्यासाठी अनेक

मुलींशी गप्पा मारल्या . त्या गप्पांतून निघालेला एक

महत्त्वाचा मुद्दा असा की फेसबुक किंवा इतर सोशल

नेटवर्किंग साइटस मुलींसाठी ऑनलाइन कट्ट्याचं

काम

करतात . कितीही झालं तरी कट्टा म्हटलं की मुलांचाच

ग्रुप समोर येतो . मुलींनी गप्पा मारायच्या , एकत्र

धम्माल करायची , तर कुठे ? हा प्रश्नच असतो .

मोठ्या

शहरांतून कॉलेजांचे कट्टे आहेत , पण छोट्या शहरांचं ,

गावांचं काय ? त्याशिवाय कॉलेजबाहेरच्या

वयोगटाला नुसत्या गप्पा मारण्यासाठी जागा

हवी म्हटलं तरी हॉटेल , एखादीचं घर , बाग अशाच

जागा

असतात . या जागांवरही बोलताना काही बंधनं

येतातच . सोशल साइट्सवर अशी सगळी बंधनं गळून

पडतात .

तिथे तुम्हाला ' गप्प राहा ' असं म्हणणारं

कुणी नसतं .

म्हणूनही अनेकजणी या ऑनलाइन कट्ट्याला इतक्या

अॅडिक्ट झालेल्या असतात .

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुली आणि गॉसिप्स .

कित्ती काही म्हटलं तरी गॉसिपिंग म्हणजे मुलींचा

वीकपॉइंट . सोशल साइटसवरुन तर अशा गॉसिपिंगला

अगदी खतपाणीच मिळतं . पण हे गॉसि ‌ पिंग

कायमस्वरुपी

, वाइट - साइट किंवा कुजकं नसतं हां . कुणाचं लग्न

झालं ,

कुणाच्या बहिणीला बाळ झालं , कुठल्या मुलीचं

कुठल्या मुलाबरोबर अफेअर चालू आहे अशा सगळ्या

प्रकारच्या बित्तंबातम्या या सोशल साइट्सवरुन

अगदी

परफेक्ट मिळतात .

फेसुबुकावरुन फोटो अपलोड करण्यात तर

मुली अगदीच

आघाडीवर असतात . आपल्या फ्रेंडलिस्टमधल्या

जास्तीतजास्त लोकांच्या लाइक्स आणि कमेंटस

पाहिल्यावर तर फोटो अपलोड करायला एक नवा हुरुप

येतो . नुकतंच लग्न झालेली एक मैत्रीण म्हणाली , '

आमचं

लव्हमॅरेज असलं तरी , रोमँटिकपणाच्या नावाने सगळा

आनंदच आहे . मी एखादा नवा ड्रेस घातला ,

हेअरस्टाइल

केली तरी याच्या लक्षातच येत नाही . बरं , आलं

तरी ते

सांगावं असं काही याला वाटत नाही . गेल्या चार -

पाच वर्षांच्या आमच्या रिलेशनशिपमुळे मला चांगलंच

ठाऊक झालंय , तो हे मुद्दामहून करत नाही .

तो त्याचा

स्वभावच नाही . त्यामुळे रागावूनही उपयोग नसतो .

पण

माझे फोटो एफबीवर टाकायला मला आवडतात .

कारण

तिथे मला दाद मिळते . ही दाद मला कुणा पुरुषाकडूनच

नको असते . मला कमेंट्स आणि लाइक

देणा ‍ ऱ्या माझ्या

खास मैत्रिणीच असतात . पण त्यांच्याकडून मिळणारं

ते

अॅप्रीसिएशन , कौतुक मला आवडतं .' तिचं हे

उदाहरण अगदी

बोलकं आहे .

अनेकदा वैयक्तिक जीवनात , आयुष्यात फारशी न

बोलणारी माणसं व्हर्च्युअल जगात मात्र प्रचंड

अॅक्टिव्ह

असलेली दिसतात . हीच गोष्ट अनेक मुलींच्या ,

महिलांच्या बाबतीतही होत असावी . फेसबुक किंवा

सोशल साइट्सवर

असलेली वेगवेगळ्या विषयांवरची पेजेसही

अनेकींना भुरळ पाडतात . अगदी साड्या ,

अॅक्सेसरीजपासून पुस्तक , आवडत्या लेखकापर्यंत

अनेक

विषयांवर असलेली ही पेजेस मुलींमध्ये विशेष

लोकप्रिय

असतात .

यानंतर एक मोठा प्रश्न येतो की मुली त्यांचे फोटो

आणि त्यांच्या माहितीचा दुष्परिणाम कसा

टाळतात ? यावरही उत्तर आहेच . मुळात अनेकजणी ,

अकाऊंटमध्ये आपले फोटो किंवा फार पर्सनल माहिती

देणं टाळतात . दुसरी मोठी गोष्ट म्हणजे , मुली

टेक्नोसॅव्ही नसतात हा समज आपण आता विसरायला

हवा . सोशल साइट्सला सो कॉल्ड अॅडिक्ट

असणा ‍ ऱ्या ब

‍ ऱ्याचजणींना त्या साइटच्या सेटिंग्जचीही पूर्ण

कल्पना असते . त्यामुळे पर्सनालाइज्ड सेटिंग्ज

ठेवणं ,

अनोळखी लोकांना अॅक्सेप्ट न करणं अशा अनेक

काळज्या

घेऊन त्या हा फेसबुकचा गड लढवत असतात .

............

चॅटिंग टाळते ...

ज्यांचा जॉबच सतत कम्प्युटरसमोर असतो ,

त्यांच्यासाठी या सोशल साइट्स म्हणजे एक

रिफ्रेशमेंट

असते . मी ऑलमोस्ट दिवसभर लॉग्ड इन असते ,

या सोशल

साइट्सचे नवनवे फंडे मला जास्त आकर्षित करतात .

मला

वेगवेगळ्या भाषांतलं लिखाण आवडतं . त्याप्रकारचे

अनेक

पेजेस मी लाइक केलेले आहेत . त्याचे अपडेट्स

मला कायम मिळत

राहतात . म्हणून मला हे आवडतंय . गेली चार वर्षं

मी एफबी

वापरतेय . पण मी कंटाळले नाहीय . मी फेसबुकवर

चॅटिंग

शक्यतो टाळते . मला ते फारसं विश्वसनीय वाटत

नाही .

माझी सेटिंग्ज खूप पर्सनालाइज्ड आहेत .

सहसा कोणी

त्याचा मिसयुज करु शकत नाही . त्यातूनही एखादं

प्रोफाइल वेगळी वाटलंच तर रिपोर्ट अब्युजचा मार्ग

आहेच

की . - सुखदा आयरे , लेखिका

संपर्कात राहण्यासाठी ...

मित्र - मैत्रिणींशी व्यवस्थित टचमध्ये रहायचं झालं

तर

फेसबुक किंवा इतर सोशल

साइट्ससारखा दुसरा चांगला

मार्ग नाही . प्रोफेशनल असोत किंवा पर्सनल

काँटॅक्टसाठी मला फेसबुकचा खूप उपयोग होतो . मी

दिवसातला किती वेळ ऑनलाइन असते हे सांगणं तसं

अवघड

असतं . कारण पीसी असो वा मोबाइल कुठून ना कुठून

मी

लॉग इन असतेच . एकदा ऑनलाइन गेले की ऑफलाइन

जाणं

होतच नाही . मला शेअर , कमेंट्स वगैरे

करण्यापेक्षा लाइक्स

द्यायला आवडतात . माझं चॅटही ब ‍ ऱ्यापैकी सुरू

असतं . खूप

पर्सनलाइज्ड फोटो टाकायला आवडत नाही . तसे

काही टाकायचे झालेच तरी त्यानुसारची सेटिंग्ज मी

केलेली आहेत . त्यामुळे फेसबुकवर

अजूनतरी काही वेगळा अनुभव

आलेला नाही . त्यामुळे आय अॅम हॅप्पी विथ माय

एफबी

No comments:

Post a Comment